Nigdi : जागतिक महिला दिनानिमित्त नृत्य, गायन, वादन स्पर्धा

एमपीसी न्यूज – नेहरू युवा केंद्र क्रीडा मंत्रालय, भारत सरकार व डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी यांच्या संयुक्‍त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त 1 ते 3 मार्च या कालावधीत नृत्य, गायन, वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती डॉ. नंदकिशोर कपोते यांनी दिली.

स्पर्धेचे यंदाचे अकरावे वर्ष आहे. यावेळी शास्त्रीय, फिल्मी व वेस्टर्न अशा प्रकारात नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. तबला, हार्मोनियम, सतार अशा विविध प्रकारात स्पर्धा होणार आहेत. विविध वयोगटातील स्पर्धेत महिलांच नव्हे तर पुरुषांनाही सहभागी होता येणार आहे.

प्रत्येक वयोगटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना गौरविण्यात येईल. स्पर्धेत सहभागासाठी डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी येथे नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिला दिनाच्या दिवशी 8 मार्चला स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल. तसेच यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.