-MPC-TOP-MOST-BANNER-I

Nigdi : रुग्णालयात दातांच्या उपचारासाठी दाखल झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – दातांच्या दुखण्यासाठी एका 23 वर्षीय तरुणीला निगडी प्राधिकरण येथील स्टर्लिंग आयुर्वेदिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरु असताना दातांमधून अतिरक्तस्राव झाला आणि त्यातच तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना घडली.

धनश्री जाधव (वय 23) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत तिच्या पालकांनी निगडी पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे.

  • मिळालेल्या माहितीनुसार, धनश्रीला मागील काही दिवसांपासून दातांशी संबंधित त्रास होता. त्यामुळे मागील दीड वर्षांपासून तिच्यावर निगडी प्राधिकरणातील स्टर्लिंग आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. मागील आठ दिवसांपूर्वी पुढील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु होते.

दरम्यान, तिच्या दातांमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यातच तिची प्रकृती ढासळली. याकडे रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यातच धनश्रीचा मृत्यू झाला.

  • याबाबत धनश्रीच्या नातेवाईकांनी निगडी पोलिसात डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची तक्रार केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.