Nigdi: बँकॉकला फिरण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी

Nigdi: Demand for money from parents to travel to Bangkok, case registered in police आरोपींनी आपसात संगनमत करून बँकॉक येथे फिरण्यासाठी, इर्टिगा कार घेण्यासाठी, जिमच्या दुरुस्तीसाठी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली.

एमपीसी न्यूज- बँकॉक येथे फिरण्यासाठी तसेच अन्य कारणांसाठी माहेरहून पैसे घेऊन ये, अशी मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. अशी फिर्याद विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात दिली आहे.

मयूर कटके (वय 33), लता केशव कटके (वय 56), केशव तुकाराम कटके (वय 60), कांचन प्रशांत घिसरे (वय 40, सर्व रा. आकुर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जानेवारी 2016 ते 30 जून 2020 या कालावधीत आरोपींनी आपसात संगनमत करून बँकॉक येथे फिरण्यासाठी, इर्टिगा कार घेण्यासाठी, जिमच्या दुरुस्तीसाठी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली.

ओटी भरण्याच्या कार्यक्रमात रिटर्न गिफ्ट का दिले नाही, यावरून त्रास देत त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच विवाहितेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.