Nigdi : त्रिवेणीनगर चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ग्रेडसेपरेटर बांधण्याची मागणी

एमपीसी न्यूज – स्पाईन रस्त्यावरील त्रिवेणीनगर चौक हा पुणे-मुंबई महामार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग यांना जोडणारा आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसर आणि तळवडे, चाकण आद्योगिक परिसराला जोडणारा आहे. त्यासाठी सुरक्षित वाहतूक आणि सुरळीत दळणवळणासाठी त्रिवेणीनगर चौकात ग्रेडसेपरेटर बांधण्याची मागणी केली जात आहे.

स्पाईन रस्त्यावरील त्रिवेणीनगर चौक जंक्शन ठरू लागला आहे. पुणे-मुंबई महामार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग या दोन महामार्गांना जोडणारा चौक आहे. त्यासोबत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीला लागून विकसित -झालेल्या चाकण एमआयडीसी, तळवडे आयटी पार्कला जाण्यासाठी नागरिकांना, तसेच दोन्हीकडील कारखानदारांसाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण आहे. या चौकातून असंख्य माल वाहतूक करणा-या वाहनांची वर्दळ असते. यामुळे या रस्त्यावरून रोजच प्रवास करणा-या नागरिक, विद्यार्थी व ज्येष्ठ मंडळींना त्रास सहन करावा लागतो.

अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरवासियांची गरज लक्षात घेता महापालिकेने या ठिकाणी ग्रेडसेपरेटर बांधण्याचे नियोजन करावे, अशी मागणी नगरसेवक उत्तम केदळे व नगरसेविका कमल घोलप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.