Nigdi: ‘बेकायदा बांधकामाला निधी देणा-या राज्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा’

स्थानिक नागरिकांची मागणी

एमपीसी न्यूज – निगडी, सेक्टर 26 गणेश तलाव येथील संत रविदास मंदिरालगत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम सुरु आहे. या बांधकामाला राज्यकर्ते शासकीय निधी देणार असल्याचा आरोप करत बांधकामधारक, राज्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

निगडी, संत रविदास मंदिरालगत प्राधिकरणाची जागा आहे. ती जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून जागेची देखभाल केली जाते. या जागेवर बेकायदेशीर बांधकाम सुरु आहे. सेक्टर 26 गणेश तलाव येथील संत रविदास मंदिरालगत सुरु असलेले बेकायदा बांधकाम थांबविण्याबाबत महापालिकेच्या सारथी हेल्पलाईवर तक्रार केली आहे. परंतु, त्याची दखल घेतली जात नाही. त्याउलट बांधकाम जोरात सुरु आहे. या बेकायदा बांधकामाला काही राज्यकर्ते आपला शासकीय निधी देणार असल्याचा आरोपही स्थानिकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

महाराष्ट्र सरकारने 2015 नंतरच्या बेकायदेशीर बांधकांना, अतिक्रमणांना संरक्षण, प्रोत्साहन देणा-यांविरुद्ध mrtp अॅक्ट 52, 53, 54 नुसार कारवाई करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार निगडीत बेकायदा बांधकाम करणा-यावर आणि त्याला शासकीय निधी देणा-या राज्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन आणि धर्मादाय आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. या पत्रावर 150 स्थानिक नागरिकांनी स्वाक्ष-या केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.