Nigdi : सहयोग फाउंडेशनच्या वतीने वनवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप

एमपीसी न्यूज- यमुनानगर येथील सहयोग फाउंडेशनच्या वतीने यमुनानगर मधील नागरीकाच्या सहकार्याने वनवासी बांधवांना 125 किलो दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

लवासाजवळील लव्हार्डे तसेच पिरंगुट जवळील कांढूर व जातेड येथील 125 कातकरी कुटुंबाना हा दिवाळी फराळ देण्यात आला. रविवारी (दि. ४) रोजी झालेल्या कार्यक्रमाला नंदकुमार कुलकर्णी, विकास देशपांडे, धनाजी शिंदे, प्रकाश साकुरे, अजय म्हाळस, आदित्य कुलकर्णी, सुभाष सराफ, ढमाले, मंगलमहाराज जगताप, समुद्र, नलिनी वाणी, रंजना गो-हाणे तसेच सोहम देशपांडे व पार्थ समुद्र ही शाळकरी मुले आदी सहयोगचे सदस्य उपस्थित होते.

दरवर्षी सहयोग फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबविण्यात येतो. त्याचप्रमाणे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.