Nigdi: मागासवर्गीय समाजातील पदवीधर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च सामाजिक न्याय विभाग करणार – दिलीप काबंळे

एमपीसी न्यूज – मागासवर्गीय समाजातील बारावी नंतरच्या विद्यार्थांचा, पदवीधर विद्यार्थ्यांचा देशातील आणि परदेशातील शैक्षणिक खर्च सामाजिक न्याय विभाग करेल. शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान भक्ती-शक्ती चौक निगडी येथे आयोजित करण्यात आलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधनपर्वाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कलारत्न पुरस्कार सोपान हरिभाऊ खुडे यांना अण्णा भाऊ साठे प्रबोधनपर्व समितीच्या वतीने, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते देण्यात आला.

कार्यक्रमास महापौर राहुल जाधव, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ‘फ’ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, शिक्षण मंडळ उपसभापती शर्मिला बाबर, नगरसदस्या सुमन पवळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माजी नगरसदस्य प्रल्हाद सुधारे, साहित्यिक सोपान हरिभाऊ खुडे, प्रबोधनपर्व समितीचे अध्यक्ष अरुण जोगदंड, अमित गोरखे, बापू घोलप, भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, मनोज तोरडमल, अनिल सौंदडे, नितीन घोलप, धनंजय भिसे, सुनील भिसे, दत्तू चव्हाण, भानुदास साळवे, शिवाजी साळवे, अशोक कांबळे, केसर ताई लांडगे, आशा शहाने उपस्थित होते.

दिलीप कांबळे म्हणाले, “शहरात व्यवसाय करणा-या युवकांना मागासवर्गीय महामंडळाच्या वतीने एक ते दहा कोटींचे कर्ज देण्यात येईल. परंतु, कर्ज घेऊन व्यवसाय करा. घर प्रपंच सांभाळा व कर्ज फेडा. शासन राबवित असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा. त्याबाबत इतरांना माहिती द्यावी. सर्व समाजाने संघटीत होऊन समाज बळकटीसाठी कार्य करावे”

महापौर राहुल जाधव म्हणाले, “प्रबोधनपर्वाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याच्या अनेक पैलूंचे दर्शन जनतेला झाले. समाजाने कायम एकसंध राहणे, समाजाच्या प्रवाहात येणे ही काळची गरज आहे. अण्णाभाऊ साठे यांचे विचार देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे सामाजिक कार्य या प्रबोधनपर्वाद्वारे करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण जोगदंड यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे व किशोर केदारी यांनी केले. तर, आभार अनिल सौंदडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.