BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी

36
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेतील 93 नाट्यछटा अंतिम फेरीत पोहचल्या आहेत. अंतिम फेरी रविवारी (दि.12) निगडी-प्राधिकरण येथील ज्ञान प्रबोधिनीच्या नवनगर विद्यालय येथे होणार आहे. पिंपरी-चिंचवड विभागातील स्पर्धेचं यंदाचं हे चौथे वर्ष आहे.

पिंपरी-चिंचवड विभागातील स्पर्धेची प्राथमिक फेरी चार केंद्रांवर पार पडली. प्राथमिक फेरीत 500 च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा बक्षीस समारंभ याच दिवशी रविवारी सायंकाळी पाच वाजता मनोहर वाढोकर सभागृहात होणार आहे. ज्ञानप्रबोधिनीचे शिक्षण समन्वयक शिवराज पिंपुडे, नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष अमित गोरखे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कार्यकारी सदस्य कीर्ती मटंगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.

स्पर्धकांचा वाढता उत्साह पाहता यावेळी सिटी प्राईड, प्राधिकरण हे एक जास्तीचे केंद्र जाहीर करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड विभागातील प्राथमिक फेरी अविष्कार बालभवन, चिंचवड, मधुश्री कलाविष्कार, निगडी, भारतीय जैन संघटना विद्यालय, संत तुकारामनगर आणि ब्लू रीड्‌ज पब्लिक स्कुल, हिंजवडी या चार केंद्रांवर पार पडल्या, अशी माहिती नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी दिली.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.