Nigdi : दिव्यांग मुलांनी घेतला झुंबा नृत्याचा आनंद

एमपीसी न्यूज- एरोबिक्स, बॉलिवूड नृत्य, झुंबा हे प्रकार सध्या प्रचंड लोकप्रिय आहेत. नाचता नाचता व्यायाम होऊन जाणारी संकल्पना आकर्षक आणि मजेशीर वाटावी अशी आहे. या नवीन संकल्पनेची ओळख व्हावी या उद्देशाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी झुंबा प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती ब्रम्हदत्त विद्यालयाचे संचालक नगरसेवक अमित गावडे यांनी दिली.

निगडी प्राधिकरणातील ब्रह्मदत्त विद्यालयामध्ये गुरुवारी (दि. २०) शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र जोशी यांच्या प्रयत्नाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सलग 13 तास पोहून लिम्का रेकॉर्ड करणारा, आंतरराष्ट्रीय खेळाडू, अमेरिकेत 2015 चा झुंबा पॅशन पुरस्कार प्राप्त पहिला झुंबा प्रशिक्षक विशेष विद्यार्थी रोहित सावंत याने मार्गदर्शन केले.

या उपक्रमात कामायनी निगडी, सिंधुताई जोशी उद्योग केंद्र तळेगाव, दिशा स्कूल देहू या शाळेतील मानसिक दिव्यांग विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. शाळेचे प्रमुख दिलीप भोसले, सुनंदा जोशी, दशरथ दातीर हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रह्मदत्त विद्यालयातील कर्मचारी स्नेहा बुरसे, मालन तिडके, कांबळे, सविता रोडे व सर्व पालकांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.