BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचे यश

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात निगडीच्या ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाने प्रथमच विजेतेपद मिळवले.

या स्पर्धेसाठी एकूण 31 शाळांनी सहभाग घेतला होता. ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या खेळाडूंना क्रीडा शिक्षक शंभूराजे मनुर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

HB_POST_END_FTR-A2

.