Nigdi : विवाहितेला पेटविण्याची धमकी ; पतीसह सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज- हुंड्यासाठी विवाहितेला बेदम मारहाण करत पेटवून देण्याची धमकी दिली. या प्रकरणी शनिवारी (दि. 13 ) निगडी पोलीस ठाण्यात पतीसह सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी छाया विलास गायकवाड यांनी फिर्याद दिली असून विलास गायकवाड, बायडाबाई गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आदरवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेरून पैसे आण म्हणत विवाहितेला नवरा व सासूने लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करत तिला गंभीर जखमी केले. यामध्ये तिचा डावा हात फ्रॅक्चर झाला तर दात तुटला. मारहाणीनंतरही तू पैसे आणले नाहीत तर तुला पेटवून देऊ अशी धमकी तिला देण्यात आली. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.