Nigdi: पतंग उडविण्याचा आनंद घेताना निष्पाप पक्षांवर संक्रांत नको -धनंजय शेडबाळे

एमपीसी न्यूज – परंपरेनुसार संक्रांतीनमित्त मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्याचा आनंद सर्वत्रच घेतला जातो. या पतंगाच्या मांज्यामुळे जसे दुचाकी वाहनांचे अपघात घडतात. त्याप्रमाणे पक्षांचेही अपघात घडतात. प्रत्यक्ष पतंग उडवताना व त्यानंतरही पुढे अनेक दिवस झाडांवर अडकलेल्या मांजामध्ये निष्पाप पक्षी अडकून पडतात, जखमी होतात. यासाठी पतंग उडवणारांनी पतंगाच्या मांजात पक्षी अडकणार नाहीत तसेच तुटलेला मांजा किंवा दोरा झाडा-झुडपात, खांबावर अडकून राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे धनंजय शेडबाळे यांनी केले. मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.

यावेळी भास्कर रिकामे यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पिंपरी-चिंचवडमधील खालील पक्षीमित्र पतंगाच्या मांजामध्ये किंवा अन्य ठिकाणी अडकलेल्या जखमी पक्षांना व्यवस्थित सोडवून त्यांच्यावर उपचार करणार असल्याचे सांगितले. या सर्व पक्षीमित्रांचे नंबर प्रसिद्ध केले आहेत. नागरिकांना कुठेही पक्षी अडकलेला आढळला तर, खालील पैकी कोणत्याही नंबरवर कळवावे निष्पाप पाखरांना जीवदान देऊन संक्रात आनंदाने साजरी करावी, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

 • 1) राजेश – 9552802277
  2) भाऊसाहेब – 8888811936
  3) शुभम – 9503008962
  4) अभिजित – 9527099056
  5) विशाल 9850993688
  6) लालासाहेब 8698419922
  7) योगेश – 9527987028
HB_POST_END_FTR-A2