Nigdi: पावसामुळे निगडीतील राष्ट्रध्वज सप्टेंबरपर्यंत फडकणार नाही

Due to rains, the national flag will not be flown at Nigdi till September

एमपीसी न्यूज – पावसाळा, हवेचा उच्चदाब व प्रवाहामुळे निगडीतील 107 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज वारंवार खराब होतो. त्यासाठी पावसाळ्यात राष्ट्रध्वज न फडकाविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 15 ऑगस्ट वगळून 1 जून ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंत राष्ट्रध्वज फडकणार नसल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

देशाच्या राष्ट्रध्वजाविषयी असलेले प्रेम नव्या पिढीच्या मनात कायम रुजत राहावे, या हेतूने पिंपरी-चिंचवड महापालिकेने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान परिसरात सुमारे 107 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाची उभारणी केली आहे.

उंची जास्त असल्याने पावसाळ्यात ध्वज फडकता ठेवण्यात अडचणी येत होत्या. वा-याचा वेग आणि वजनामुळे वारंवार ध्वज उतरावा लागत होता.

त्यामुळे महापालिकेने 6 सप्टेंबर 2018 मध्ये ध्वज फडकता ठेवण्याबाबत निर्णय घेतला. वर्षात 1 ऑक्टोबर ते 31 मे या आठ महिने कालावधीत ध्वज फडकता ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

तर, 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये पावसाळा असल्याने तसेच हवेचा उच्चदाब व प्रवाह यामुळे राष्ट्रध्वज वारंवार खराब होतो.

त्यामुळे या कालावधीत राष्ट्रध्वज न फडकवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 जून ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत 15 ऑगस्ट वगळून राष्ट्रीय ध्वज फडकाविण्यात येणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.