Nigdi : कोयत्याचा धाक दाखवून तिघांचा दारूच्या दुकानातून राडा; दारूच्या बाटल्या पळविल्या

एमपीसी न्यूज – दुकानात आरडाओरडा करू नका, म्हणणा-या दारूच्या दुकानदाराला तिघांनी मिळून मारहाण केली. तसेच दुकानातील टीव्ही व कॅमेरे फोडून मोबाईल फोन आणि दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. ही घटना बुधवारी (दि. 10) दुपारी दोनच्या सुमारास आकुर्डी भाजी मंडई जवळ असलेल्या देशी दारू दुकानात घडली.
प्रदीप लक्ष्मणराव खिरडे (वय 27, रा. निगडी, प्राधिकरण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप यांचे आकुर्डी भाजी मंडईजवळ सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. बुधवारी दुपारी प्रदीप त्यांच्या दुकानात असताना आरोपी तीनजण दारू पिण्यासाठी आले. दारू पिताना ते गोंधळ घालत होते. त्यामुळे प्रदीप यांनी त्यांना आरडाओरडा करू नका असे सांगितले. त्यावरून तिघांनी मिळून दुकानातील टीव्ही आणि कॅमेरे फोडून टाकले.
प्रदीप यांच्या डोक्यात दारूच्या बाटल्या फोडून कोयत्याने वार केले. तसेच कोयत्याचा धाक दाखवून दुकानातून हजारो रुपयांच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.