Nigdi : कॅमेरा फोडून डीव्हीआर पळवला; अज्ञातांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सेफ्टी डोअरचा कोयंडा कापून सोसायटीतील मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या कॅमे-याचे नुकसान केले. तसेच दोन डीव्हीआर व इतर ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 9) पहाटे साडेपाचच्या सुमारास आकुर्डी येथील पांढरकर वस्ती येथे उघडकीस आली.

मोहम्मद कौसर सय्यद (वय 47, रा. पांढरकर वस्ती, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या फ्लॅटच्या सेफ्टी डोअरचा कोयंडा कापला. लोखंडी जाळीचे कुलूप तोडून सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कॅमेरा फोडून नुकसान केले. 20 हजार रुपये किमतीचे दोन डीव्हीआर तसेच 6 हजार 500 रुपयांचा इतर माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.