_MPC_DIR_MPU_III

Nigdi : मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार पिता-पुत्राला गुन्हे शाखा युनिट दोन कडून अटक

एमपीसी न्यूज – निगडी पोलीस ठाण्यातील मारहाणीच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपासून फरार असलेल्या पिता-पुत्राला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 19) सुतारवाडी, घोटावडे फाटा येथे करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_IV

प्रकाश महादू रणदिवे (वय 43), सुरज प्रकाश रणदिवे (वय 22, दोघे रा. नंदनवन हाऊसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका मारहाणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले पिता-पुत्र दोन महिन्यांपासून फरार होते. हे फरार आरोपी सुतारवाडी, घोटावडे फाटा येथे ओळख लपवून राहत असल्याची माहिती पोलीस नाईक फारूक मुल्ला यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा घोटावडे फाटा चौकात शोध घेतला. त्यावेळी प्रकाश रणदिवे पोलिसांना पाहून पळू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने निगडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची कबुली दिली.

त्या गुन्ह्यातील त्याचा साथीदार आणि मुलगा याच्याबाबत चौकशी केली असता तो देखील ओळख लपवून त्याच परिसरात राहत असून प्रकाश याला भेटायला येणार आहे, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून प्रकाश याला भेटण्यासाठी आलेल्या संशयित तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तोच प्रकाश याचा मुलगा व गुन्ह्यातील साथीदार असल्याचे निष्पन्न आले. यावरून दोघा पिता-पुत्राला अटक करून पुढील कारवाईसाठी निगडी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, सहाय्यक पोलीस फौजदार संपत निकम, पोलीस कर्मचारी धर्मराज आवटे, प्रवीण दळे, फारूक मुल्ला, जमीर तांबोळी, नितीन बहिरट यांच्या पथकाने केली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.