Nigdi : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आचारणात आणणा-यांचा सावरकर मंडळातर्फे गुरुवारी सत्कार 

एमपीसी न्यूज- स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आचारणात आणणारे आणि हिंदुत्वाच्या खंद्या समर्थकांचा निगडीतील सावरकर मंडळातर्फे उद्या (गुरुवारी) जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. 

निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संघचालक नाना जाधव, प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण धबडगाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.

महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कामगार, पर्यावरण राज्यमंत्री बाळा भेगडे, पुण्याचे खासदार गिरीश बापट, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांच्या सत्कार करण्यात येणार आहे. सावरकरांचे हे खंदे समर्थक प्रांतात मोठ्या जबाबदा-या पार पाडत आहेत.  त्यांचा मंडळातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे मंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.