Nigdi : दारुला पैसे न दिल्याने आईवर कोयता उगारणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईवर कोयता उगारणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 21) सायंकाळी अजंठानगर, चिंचवड येथे घडली.

सविता माणिक पोळ (वय 45, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रकाश माणिक पोळ असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी सविता, त्यांचे पती माणिक आणि दुसरा मुलगा आकाश हे घरात बसले होते. त्यावेळी आरोपी मुलगा प्रकाश आला. त्याने दारूसाठी आईकडे पैसे मागितले. त्यावेळी आईने पैसे देण्यास नकार दिला.

या कारणावरून चिडलेल्या आरोपी प्रकाश याने शिवीगाळ करीत आईला मारण्यासाठी कोयता घेऊन अंगावर धावून आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.