Nigdi : निगडी, सांगवीमधून पाच मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – निगडी आणि सांगवी परिसरातून 28 हजार 800 रुपये किमतीचे पाच मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडल्या. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मयूर अशोक सरोदे (वय 19, रा. आकुर्डी. मूळ रा. मनमाड, नाशिक) यांनी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली.

मयूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मयूर आकुर्डी खंडोबा माळ येथे भाड्याने राहतात. 6 ऑगस्ट रोजी रात्री खोलीची कडी लावून ते झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाजा उघडून 20 हजार 800 रुपये किमतीचे चार मोबाईल फोन, इतर वस्तू आणि रोकड चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
  • सांगवी पोलीस ठाण्यात अविनाश अशोक जाधव (वय 24, रा. कात्रज. मूळ रा. उमरगा, जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रमेश उर्फ तिम्म्या महादेव देवकीरी (वय 22, रा. जुनी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 3 ऑगस्ट रोजी अविनाश त्यांचे मित्र अक्षय चव्हाण यांच्या शितोळेनगर येथील घरी झोपायला गेले. रात्री घराच्या उघड्या दरवाजातून रमेश याने घरात प्रवेश केला. त्याने अविनाश यांचा आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.