Nigdi : पीएमपीएमएल मधून प्रवास करताना पर्समधून साडेपाच तोळे सोने लंपास

एमपीसी न्यूज – चालत्या पीएमपीएमएल बस मध्ये महिलेच्या पर्समधून 1 लाख 16 हजार 600 रुपये किमतीचे साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 27) रोजी दुपारी एकच्या सुमारास निगडी येथे घडली.

प्रमीला प्रमोद धर्माधीकारी (रा. टिळक चौक, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमिला टिळक चौक येथून पीएमपीएमएल बस मध्ये बसल्या. त्या पुढे खंडोबा माळ आकुर्डी येथे उतरल्या. बसमधून उतरल्यानंतर त्यांनी त्यांची पर्स तपासणी असता पर्समधील तब्बल साडेपाच तोळ्यांचे 1 लाख 16 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागीने चोरीला गेले असल्याचे समजले. यावरून त्यांनी तात्काळ निगडी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.