Nigdi flyover Bridge News : महापौरांआधी राष्ट्रवादीकडून भक्ती शक्ती उड्डाणपुलाचे उदघाटन

उद्या महापौर माई ढोरे यांच्या हस्ते उड्डाणपुलाच्या उदघाट्नचा कार्यक्रम होणार आहे

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावर भक्ती-शक्ती चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे उदघाटन राष्ट्रवादीकडून करण्यात आले. शहराच्या महापौर ढोरे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचा उदघाटन समारंभ गुरुवारी (दि. 10) करण्याचे नियोजन असतानाच एक दिवस अगोदर राष्ट्रवादीकडून या उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेविका सुमन पवळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, विशाल काळभोर, माजी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भक्ती शक्ती चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. भक्ती शक्ती चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. मार्गावरील वाहनांना मोठा वळसा घालून जावे लागत असल्याने जुना पुणे-मुंबई महामार्ग सुरू करण्याची मागणी नागरिक आणि राजकीय पक्षांकडून होत होती.

उड्डाणपुलावरील मुंबई-पुणे या एका लेनचे काम पूर्ण झाले असल्याने ही एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. उड्डाणपुलाचे उदघाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

हा उदघाटन समारंभ गुरुवारी (दि. 10) सकाळी दहा वाजता होणार आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादीकडून बुधवारी (दि. 9) उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.