Nigdi : जुन्या भांडणावरून महिलेला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी महिलेला बेदम मारहाण केल्याची फिर्याद जखमी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात दिली. ही घटना 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे घडली.
_MPC_DIR_MPU_II
रंजना सोमनाथ पवार (वय 39, रा. ओटास्किम, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, दिलीप लक्ष्मण मोरे (वय 45), राहुल मोरे (वय 19), आकाश मोरे (वय 20), सुरज मोरे (वय 19, सर्व रा. ओटास्किम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी रंजना यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यामध्ये रंजना यांच्या पाठीवर, हातावर गंभीर इजा झाली. आरोपी आकाश आणि सूरज यांनी रंजना यांना दगडाने मारहाण केली असल्याचे रंजना यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.