Nigdi : निगडी प्राधिकरणमध्ये पावणेचार लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरणमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी 3 लाख 89 हजार 360 किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि वस्तू चोरून नेल्या. हा प्रकार गुरुवारी (दि. 31) सकाळी साडेसहाच्या सुमारास प्राधिकरण निगडी येथील पेठ क्रमांक 28 येथे उघडकीस आला.

वैभव वीरभद्र स्वामी (वय 31, रा. पेठ क्रमांक 28 प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव यांचे घर बुधवारी रात्री साडेआठ ते गुरुवारी सकाळी साडेसहा या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्याने दरम्यानच्या कालावधीत घरातून सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल फोन व इतर वस्तु असा एकूण 3 लाख 89 हजार 360 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.