BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : गॅस एजन्सी मधील कॅशिअरला लुटणाऱ्या चौघांना अटक

0 653
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – गॅस एजन्सी मधील कॅश बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असताना चौघांनी कॅशियरच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटले. ही घटना गुरुवारी (दि. 16) सकाळी सव्वानऊच्या सुमारास दळवीनगर पुलावर घडली. चारही आरोपींच्या निगडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

जावेद इद्रिस शेख (वय 19), मोहम्मद मुर्तुजा आकसापुरे (वय 22), दीपक कालिदास तेलंग (वय 22), विजय लहू शिंदे (वय 19) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. सुहास पांडुरंग मोहिते (वय 40, रा. प्राधिकरण निगडी) यांनी या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास काळेवाडी येथील भारत गॅस एजन्सी मध्ये कॅशियर म्हणून काम करतात. गुरुवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास गॅस एजन्सी मधील दोन लाख 56 हजार 457 रुपयांची रोकड बँकेत जमा करण्यासाठी सुहास जात होते. ते दळवीनगर पुलावर एका गरीब महिलेस दहा रुपये देण्यासाठी थांबले. त्यावेळी दोन दुचाकीवरून वरील चार आरोपी आले. एकाने सुहास यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. दुसऱ्याने पाठलाग केला. तिसऱ्याने कोयत्याने वार केले. तर चौथ्याने पैसे लुटून नेले. याबाबत सुहास यांनी निगडी पोलिसात गुन्हा नोंदवला. निगडी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3