Nigdi : कार विकून चांगला मोबदला मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाची दोन लाखांची फसवणूक

हा प्रकार 15 मार्च 2018 पासून 10 ऑगस्ट 2020 या कालावधीत साई माऊली मोटरर्स, आकुर्डी येथे घडला. : Fraud of Rs 2 lakh on the pretext of selling a car and earning a good price

एमपीसी न्यूज – एका एजंटने कार विकून त्याचा चांगला मोबदला मिळवून देण्याचा बहाणा केला. त्यानंतर कारचा दोन लाख 10 हजार रुपयांना सौदा करून कार घेऊन गेला. दोन वर्षानंतरही मोबदला अथवा कार काहीही न दिल्याने कार मालकाने एजंट विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 15 मार्च 2018 पासून 10 ऑगस्ट 2020 या कालावधीत साई माऊली मोटरर्स, आकुर्डी येथे घडला.

शिवाजी मनोहर देवकुळे (वय 43, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फैयाज फक्रुद्दीन शेख (रा. विद्यानगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवकुळे यांचा भागीदारीत जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता 2017 साली त्यांनी आर्थिक अडचणींमुळे तो व्यवसाय बंद केला आणि सर्व भागीदारांमध्ये वाहने वाटून घेतली. फिर्यादी यांच्याकडे मारुती स्विफ्ट कार (एमएच 06 / एएन 8166) होती.

मार्च 2018 मध्ये आरोपी शेख याने फिर्यादी यांना त्यांची स्विफ्ट कार विकून चांगला मोबदला मिळवून देतो, असे सांगितले. फिर्यादी शेख याला ओळखत असल्याने त्यांनी त्यास होकार दिला.

_MPC_DIR_MPU_II

दोन लाख 10 हजार रुपये असा कारची किंमत ठरवून शेख याने फिर्यादी यांच्याकडून कार नेली.

15 मार्च 2018 रोजी फिर्यादी यांनी कारचे प्रतिज्ञापत्र देखील आरोपीला लिहून दिले. कार घेऊन गेल्यानंतर शेख याने फिर्यादी यांच्याशी संपर्क ठेवला नाही. मार्च 2019 मध्ये शेख याने फिर्यादी यांना दीड लाख रुपयांचा चेक दिला.

मात्र, खात्यावर कमी रक्कम असल्यामुळे तो चेक एक महिन्याने भरण्यास शेख याने फिर्यादी यांना सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी एप्रिल 2019 मध्ये पुन्हा चेक बँकेत जमा केला असता खात्यावर पैसे नसल्याने चेक वटला नाही.

फिर्यादी यांनी पैसे देण्याबाबत शेखकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, शेख याने फिर्यादी यांना कार आणि पैसे यातील काहीही न देता त्यांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like