Nigdi : रक्तदान शिबिर आयोजित करुन साजरी करण्यात आली स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती

एमपीसी न्यूज – रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान( Nigdi) हेच सर्वश्रेष्ठ दान” असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. अशा प्रसंगी तरुणाईमध्ये रक्तदानाचे (Blood Donation) महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ’ निगडी च्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती व मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त जनकल्याण रक्त केंद्र, नगर यांच्या सहकार्याने आज ( दि.२७) स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, निगडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे हे 34 वे वर्ष आहे.

यावेळी प्रत्येक रक्त दात्याला प्रमाणपत्र व पर्यावरण घरोघरी पुस्तक देण्यात आले. सलग 67 वेळा रक्तदान करणारे उत्तम दगडु महाकाळ यांचा आज विशेष सत्कार करण्यात आला. शिबिरात एकूण छत्तीसहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Pimpri : असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणार, काँग्रेसचा इशारा

अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे अवाहन ,अविनाश वैद्य यांनी केले. या प्रसंगी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदानाचे महत्व सांगत जनजागृतीही केली.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन आजचे पहिले रक्तदाते रितेश गुल्हाणे यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिमेचे पूजनाने करण्यात आले. यावेळी विश्वनाथन नायर, रमेश बनगोंडे, राजेंद्र देशपांडे, अजित जगताप, वैदेही पटवर्धन, प्रदिप पाटील आदि मान्यवर उपस्थितीत ( Nigdi) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.