Nigdi : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात चार महिन्यांपासून फरार आरोपीला खंडणी दरोडाविरोधी पथकाकडून बेड्या

एमपीसी न्यूज – खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात मागील चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडाविरोधी पथकाने अटक केली.

जितेंद्र ऊर्फ जित्या आनंदा जाधव (वय 20, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक निशांत काळे व आशिष बोटके यांना माहिती मिळाली की, निगडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी जितेंद्र आळंदी येथील गाथा मंदिराच्या पुलावर थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून जितेंद्र याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यावरून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल असून तो निगडी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी निशांत काळे, आशिष बोटके, विक्रांत गायकवाड, प्रवीण कांबळे, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.