Nigdi : गणेश शिर्के यांनी पटकावला ‘फुलांचा राजा’ किताब, महिंद्रा सीआयईला ‘फुलांची राणी’ किताब

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या वृक्षप्राधिकरण समिती तर्फे आयोजित पंचविसाव्या फुले,फळे,भाजीपाला, बागा, वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शन चा बक्षीस वितरण समारंभ आज (मंगळवारी ) निगडी येथे संपन्न झाला. विजेत्या स्पर्धकांना यावेळी महापौर उषा ढोरे यांच्या हस्तेचषक देऊन गौरवण्यात आले.

पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या वृक्षप्राधिकरण समिती तर्फे २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित पंचविसाव्या फुले,फळे,भाजीपाला, बागा, वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शनाचा बक्षीस वितरण महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेत क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांची नावे खालील प्रमाणे .

1) फुलांचा राजा साठी गणेश सहादु शिर्के यांना प्रथम क्रमांकचा अल्फा लेव्हल चषक देऊन गौरवण्यात आले.
2) फुलांची राणी साठीचा खिंवसरा चषक महिंद्रा सी.आय.ई,कान्हे यांना देण्यात आला.
3) खासगी बागा शौकीन, लहान गट या श्रेणी मध्ये संजय मेहता यांना आयुक्त चषक देऊन गौरवण्यात आले तर ,
4) महापौर चषक खुल्या गटासाठी लांडेवाडी, भोसरी येथील लक्ष्मी फ्लॉवर अँड डेकोरेशनचे भारत दिलीप भुजबळ यांना प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

बक्षीस वितरण प्रसंगी अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसेविका योगिता नागरगोजे, वृक्षप्राधिकरण समिती सदस्य संभाजी बारणे, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंके, पर्यावरण संवर्धन समितीचे डॉ. विकास पाटील, उद्यान अधिक्षक डी. एन. गायकवाड, जेष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष सूर्यकांत मुथियान, आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.