Nigdi : निगडी, आळंदी येथे बस प्रवासादरम्यान सव्वा लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – निगडी आणि आळंदी येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरट्यांनी 1 लाख 17 हजार 500 रुपयांचे सोन्याची पाटली आणि गंठण चोरून नेले आहे.

पहिल्या घटनेत कल्पना रामचंद्र पिसाळ (वय 59, रा. क्रांतीनगर, आकुर्डी. मूळ रा. नांदवळ, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 21) दुपारी दीड ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास कल्पना कात्रज ते निगडी असा पीएमपीएमएल बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या डाव्या हातातील 80 हजार रुपये किमतीची 25 ग्रॅमची सोन्याची पाटली चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या घटनेत शुभांगी विनायक गायकवाड (रा. मरकळ रोड, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 22) दुपारी दीड ते दोनच्या सुमारास शुभांगी त्यांच्या नातेवाईकांसोबत आळंदी येथून देहूकडे पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 37 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.