Nigdi : उद्घाटनानंतरच्या ‘गदिमा’तील पहिल्या कार्यक्रमाला रसिकांचा मोठा प्रतिसाद

प्रभागातील नागरिकांना पहिल्या कार्यक्रमाचा मिळाला मान  

एमपीसी न्यूज – उद्घाटनानंतर ग.दि.माडगूळकर ( Nigdi ) नाट्यगृहात शहरातील स्थानिक कलाकारांच्या झालेल्या पहिल्या सुरसंगीत कार्यक्रमाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गदिमांवरील गीतांच्या या कार्यक्रमाने ख-या अर्थाने नाट्यगृहाचा पडदा उघडला. विशेष म्हणजे प्रभागातील नागरिकांना पहिला कार्यक्रम घेण्याचा मान मिळाला.

पिंपरी-चिंचवडकरांची सांस्कृतिक भूक भागविण्याबरोबरच स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी प्राधिकरणामध्ये सुजज्ज असे नाट्यगृह उभारले आहे. नाट्यगृहाला आधुनिक वाल्मिकी ग.दि.माडगूळकर यांचे नाव देण्यात आले. स्थानिक कलाकारांसाठी उभारलेल्या नाट्यगृहात  उद्घाटनानंतर शुक्रवारी (दि. 26) पहिला कार्यक्रम सादर करण्याचा मानही स्थानिक कलाकारांनाच मिळाला. श्री समर्थ युवक प्रतिष्ठान आणि माजी नगरसेवक अमित राजेंद्र गावडे यांच्या वतीने सुरसंगीत हा गीतांचा कार्यक्रम घेतला.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्रसिद्ध कथक नर्तक पं.नंदकिशोर कपोते, नृत्यकला मंदिराच्या संचालिका गुरू तेजश्री अडिगे,डॉ. संजीव कुमार पाटील,  रविंद्र घांगुर्डे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि श्रीफळ वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली. माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नितीन लांडगे, माजी गटनेते राहुल कलाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Bhosari : खिशातला मोबाईल घेतला म्हणून केला मित्राचा खून, बारा तासात आरोपीला अटक

राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रविंद्र हिच्या बहारदार गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. प्रतिकिशोर अशी ओळख असलेले जितेंद्र भुरुक, अभिषेक मारोटकर,  रुपाली आनंद यांनी विविध गीतांचे सादरीकरण केले. नितीन शिंदे यांचा ढोलक वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. ग.दि. माडगूळकर नाट्यगृहातील पहिल्या प्रयोगाला  प्राधिकरण परिसरातील प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मागील पाच वर्षात प्रशासनाकडे पाठपुरावा करून नाट्यगृहाचे काम पूर्ण केले. अतिशय दिमाखदार नाट्यगृह प्राधिकरणासह शहरवासीयांना उपलब्ध झाले आहे. नाट्यगृहातील पहिल्या कार्यक्रमाचा मान स्थानिक कलाकारांना मिळाला याचा आंनद आहे. स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमाला स्थानिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. नाट्यगृहाच्या माध्यमातून प्रेक्षकांना नाटक, नृत्य, गायन आणि इतर विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असल्याचे माजी नगरसेवक अमित राजेंद्र गावडे ( Nigdi ) म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.