Nigdi: गुजरातच्या पाणीपुरवठा मंत्र्यांनी घेतली महापालिकेच्या ‘स्काडा’ प्रणालीची माहिती

एमपीसी न्यूज – गुजरात राज्याचे पाणीपुरवठा, पशुसंवर्धन व ग्रामीण गृहनिर्माण मंत्री कुवरजीभाई बवालिया यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेक्टर क्रमांक 23, निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र व स्काडा प्रणालीची गुरुवारी (दि.20) माहिती घेतली.

गुजरात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री कुवरजीभाई बवालिया यांचे महापौर उषा ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वागत केले. या शिष्टमंडळाच्या समवेत खासगी सचिव राजेश रावल, मुख्य अभियंता निरव सोलंकी, कार्यकारी अभियंता परेश चोक्सी यांचा सहभाग होता. यावेळी सहा. आयुक्त अण्णा बोदडेसह, शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रविण लडकत, रामदास तांबे आदी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रविण लडकत यांनी सादरीकरणाद्वारे जलशुध्दीकरण केंद्र आणि स्काडा प्रणालीची माहिती दिली. तसेच शिष्टमंडळाने सेक्टर क्र. 23, निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र व स्काडा प्रणालीची पाहणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.