Nigdi : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून चार जणांनी मिळून तिघांना मारहाण करत लोखंडी कोयत्याने वार केले. तसेच जखमी तरुणाच्या खिशातून जबरदस्तीने दोन हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार रविवारी (दि. 2) रात्री साडेआठच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

आदर्श अशोक मगर (वय 21, रा. ओटास्कीम, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजय शेंडगे, अनिकते जाधव उर्फ अंड्या, तुषार झेंडे, महम्मद कोरबू (सर्व रा. अंकुश चौक, पत्रा शेड, ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री फिर्यादी आदर्श त्यांच्या मित्रांसोबत शेकोटी करून बसले होते. त्यावेळी आरोपी दुचाकी व रिक्षामधून आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून आदर्शन यांना मारहाण केली. तसेच आदर्श आणि त्यांचे मित्र मुन्ना शेख आणि विशाल खरात यांना देखील मारहाण करून लोखंडी कोयत्याने वार केले. आरोपी महम्मद याने मुन्ना शेखच्या खिशातून जबरदस्तीने दोन हजार रुपये काढून घेतले. तर तुषार झेंडे याने विशाल खरात याचा मोबाईल फोन हिसकवून नेला. आरोपींनी आसपासच्या घरांची तोडफोड करून दहशत पसरवली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.