Nigdi : हातगाडी, स्टॉल धारकांचे कृष्णानगर चौकात बेमुदत आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाकडून (Nigdi) अन्यायकारक कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप करत ही कारवाई थांबवून अधिकृत हॉकर झोनची अंमलबजावणी करावी, बोगस लाभार्थी व बोगस हॉकर झोन रद्द करावे या मागण्यासाठी चिखली रस्ता कृष्णानगर चौक येथे 8 मे पासून विक्रेत्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.

कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश संघटक अनिल बारवकर, राजू खंडागळे,प्रभाग अध्यक्ष बालाजी लोखंडे,निमंत्रक इरफान मुल्ला, धुळदेव मेटकरी,सुग्रीव नरवटे, लक्ष्मण ठोंबरे, बाळासाहेब शेडगे, पांडुरंग शेळवणे, नितीन काकडे,इम्तियाज पठाण, शंकर पवार, सविता साळुंखे, शकुंतला तुपे, मीनाक्षी साळुंखे, छाया आखाडे, शकुंतला शिंदे, अफजल आत्तार, स्मिता देशपांडे, रेवण सिद्धगुंडी, दादा भानवसे, सलीम डांगे, सुजाता नरवटे आदी उपस्थित होते.

Ashadhi Wari 2023 : वारकऱ्यांसाठी मोठी बातमी! आषाढी वारीसाठी राज्यभरातून धावणार पाच हजार बस

यावेळी नखाते म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पथविक्रेता कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी न करता मोठे व्यापारी यांना दिलासा देऊन गरिबांवर चुकीच्या पद्धतीने करवाई करण्यात येत आहे. कृष्णानगर (Nigdi) येथे साने चौक ते थरमॅक्स चौक येथील विक्रेत्यांचे नाव पुढे करून बोगस लाभार्थी, बेकायदेशीर हॉकर झोन प्रक्रिया करण्यात येत आहे.

पूर्वीच्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण व आताचे पीएमआरडीएच्या ताब्यात असलेली जागा व प्रस्तावित रिंग रेल्वेची जागा सदर ठिकाणी सिमेंटचे ओटे करून त्याला हॉकर झोन संबोधून सदरच्या ठिकाणी त्याला संरक्षण नाही. चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याला सामान्य विक्रेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. पथविक्रेता बाबत विक्रेता व संघटनेला विश्वासात घेऊन योग्य नियोजन करावे अन्यथा यापुढेही तीव्र आंदोलन सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.