Nigdi: कंपनीतील नोकरी सोडल्यावरून विवाहितेचा छळ; सासू सासऱ्यासह पतीवरही गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कंपनीत काम करणा-या महिलेने काम सोडल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी तिचा छळ केला. तसेच माहेरहून पैसे आणि दागिने आणण्याची मागणी केली. ही घटना जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधीत यमुनानगर निगडी येथे घडली.

याप्रकरणी 24 वर्षीय विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सासू सविता दत्तात्रय हरिहर, सासरे दत्तात्रय विश्वनाथ हरिहर, दीर मंगेश दत्तात्रय हरिहर, पती अविनाथ दत्तात्रय हरिहर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एका कंपनीत काम करत होत्या. मागील काही महिन्यांपूर्वी त्यांनी कंपनीतील काम सोडले. त्यानंतर, सासरच्या लोकांनी विवाहितेकडे माहेरहून पैसे, सोन्याचे दागिने व महागड्या वस्तू आणण्याची मागणी केली.

या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेला शिवीगाळ करून धमकी देत घरात कोंडून उपाशी ठेवत त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.