Nigdi : लग्नात मानपान न केल्यावरून विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या आई-वडिलांनी सासरच्या लोकांचा लग्नात मानपान केला नाही. तसेच सासरच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. या कारणावरून विवाहितेचा छळ केला. याबाबत चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना निगडी प्राधिकरण येथे घडली.

दीपक बाळासाहेब धिवार, किरण बाळासाहेब धिवार, अनुपमा बाळासाहेब धिवार, नितीन प्रकाश वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 23 वर्षीय विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी दीपक यांचे 19 जानेवारी 2018 रोजी लग्न झाले. लग्नात विवाहितेच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींच्या मनासारखे केले नाही. यामुळे सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे फ्रीज, दिवाण, गादी या वस्तूंची मागणी केली.

‘तुझी आमच्यासमोर उभा रहायची लायकी नाही. तू झोपडपट्टी छाप आहेस. तू गुलाम बनून रहा.’ असे म्हणून विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिचा छळ केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.