Nigdi : विक्रेत्या महिलेला मारहाण करून खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ फेरीवाल्यांचे हलगी आंदोलन

एमपीसी न्यूज –  पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या फ क्षेत्रीय  (Nigdi) कार्यालयाकडून बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने कारवाई सुरू असून  सचोटीने व्यवसाय करणाऱ्या मनीषा शेळवणे या महिलेला महापालिका कर्मचारी व पोलिसांनी मारहाण करून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप फेरीवाल्यांनी केला आहे. याचा निषेध करून  संबंधितांवर कारवाईची मागणी करत आज (शुक्रवारी) फ क्षेत्रीय कार्यालयावर हलगी आंदोलन करण्यात आले.

कामगार नेते काशिनाथ नखाते, जेष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक सचिन चिखले, जनअंदोलनाचा समन्वयाचे प्रसाद बागवे, प्रहार आंदोलनाचे दत्ता भोसले, राजेंद्र वाघचौरे, किरण सडेकर,राजू बिराजदार, बालाजी लोखंडे,धूळदेव मिटकरी,इरफान मुल्ला,इम्तियाज पठाण, छाया ठोंबरे,उर्मिला शेडगे,सागर ठोंबरे, सायद अली,नितीन सुरवसे, सतीश मस्तूद, पांडुरंग भोसले, जयश्री हजारे, जलाल गोलंदाज, युनूस पटवेकर, बिभीषण ठोंबरे, प्रवीण लोंढे, सुशेन खरात आदी उपस्थित होते.

थरमॅक्स चौक ते चिखली रस्त्यावरील विक्रेत्यांना जबरदस्तीने चुकीच्या पद्धतीने कारवाई करून क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे हे त्यांचा व्यवसाय हिरावून घेत आहेत.

या रस्त्यावरील विक्रेत्यांना बेकायदेशीर हॉकर झोन व बोगस विक्रेते यांना चुकीच्या पद्धतीने जागा वाटप करून जबरदस्ती केली जात आहे. याला सर्वांनी विरोध केला आहे. तर सचोटीने व्यवसाय करणाऱ्या फळ विक्रेत्या मनीषा शेळवणे यांची हातगाडी उचलून घेऊन गाडीत टाकली व परत  जाताना त्यांना  शिवीगाळ करून मारहाण केली.

Rahatani : गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

कर्मचारी आणि पोलिसांनी संगनमताने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून (Nigdi) प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप नखाते यांनी केला.

मानव कांबळे म्हणाले, की रोजगाराचा हक्क घटनेने दिला आहे. आणि तो हिरावला जात आहे. अधिकारी यांचे सर्व ऐटीत सुरू आहे. त्यांना फेरीवाल्यांच्या भावना व दुःख समजत नसतील आणि अशीच कारवाई सुरू राहिली. तर, पालिका प्रशासनाचे डोके ठिकाणावर आणण्यास वेळ लागणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.