Nigdi : पॅनआर्थो हॉस्पिटलमध्ये 8 ऑगस्टला आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथील पॅनआर्थो हॉस्पिटलच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर दि. 8 ते 10 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती पॅनआर्थो हॉस्पिटलचे संचालक डॉ. मंदार आचार्य यांनी दिली.

या आरोग्य शिबिराची माहिती देताना डॉ. मंदार आचार्य म्हणाले की, रक्त तपासणी, हाडांची ठिसुळता, फिजिशिअन व अस्थीरोग तज्ञ, दंतरोग तपासणी आदी विविध तपासण्या व शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात केल्या जाणार आहे.

  • पॅनआर्थो हॉस्पिटल हे पिंपरी-चिंचवड येथील अद्ययावत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असून आर्थोपिडीक सुपर स्पेशालिटी आहे. हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या अस्थिरोग, लहान मुलांमधील शारिरक व्यंग, मणक्याच्या आजाराचे विकार, औद्योगिक अपघात यावर तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची उपलब्धता आहे. हॉस्पिटलमध्ये सर्व इन्शुरन्सचे व कॅशलेस कार्डची उपलब्धतता आहे.

तरी याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पॅनआर्थो हॉस्पिटलच्यावतीने केले आहे. अधिक माहितासाठी ०२०-२७६४२७६४ या नंबरवर तसेच उदय निकम ९५४५८६७८५९ या नंबरवर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.