_MPC_DIR_MPU_III

Nigdi : प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्यावतीने हेल्मेट जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज _ महाराष्ट्र पोलीस दलाच्या 69 व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने हेल्मेट वापरण्याकरिता जनजागृती अभियान राबविण्यात आले.

_MPC_DIR_MPU_IV

प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या पाहणीनुसार पिंपरी आणि चिंचवड परिसरात गेल्या दोन वर्षात 189 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर ८४० जण जखमी झाले आहेत. अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. याकरिता या अभियानासाठी पोलीस सहआयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त राम जाधव, निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे,पोलीस उपनिरीक्षक सीता वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.

जनजागृतीच्या व पोलीस स्थापना दिनाच्या पार्श्वभुमीवर प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या शिष्टमंडळाने नूतन आयुक्तालायमध्ये सहआयुक्तांची भेट घेतली व शुभेछा दिल्या. यावेळी राज्य समिती अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, महिला अध्यक्ष अर्चना घाळी, विभागप्रमुख बाबासाहेब घाळी,संतोष चव्हाण,शुभम वाघमारे उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

मकरंद रानडे म्हणाले,” शहराच्या सुरक्षतेसाठी पिंपरी चिंचवड शहर पोलीस दल कटिबद्ध असून नवीन प्रशासकीय इमारतीमुळे सर्व कामे आता जलदगतीने पार पडतील. नागरिकांच्या व सामाजिक संस्थांच्या सहभागामुळे पोलीस दलास नक्कीच ऊर्जा प्राप्त होत असते”

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे म्हणाले,” युवकांनी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरण्याची सवय अंगीकारणे आवश्यक आहे. निगडी प्राधिकरण परिसरातील रस्ते विस्तृत असल्याने चालकांनी वेगावरही नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे ”

समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे पोलीस मित्र, स्वयंसेवक व विशेष पोलीस अधिकारी हे दुचाकी वाहनचालकांनी “हेल्मेट” वापरावे याकरिता शहरात प्रबोधन व जनजागृती करीत आहेत.दुचाकीच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील रस्ते अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळे हेल्मेट वापरले पाहिजे “

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.