Nigdi : प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे पोलिसांना हेल्मेट वाटप

एमपीसी न्यूज- पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षा, गस्त तसेच न्यायालयीन कामकाजानिमित्त कायम दुचाकीवरून फिरावे लागते. त्यामुळे जास्त काळ वाहनावरून फिरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती व आयुक्तालयाच्या वतीने हेल्मेट वापर जनजागृती हेतूने शहरात सुरक्षा अभियान राबविले जात आहे. त्या निमित्ताने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला निगडी पोलीस ठाणे व चिखली पोलीस ठाणे येथे हेल्मेट वाटप करण्यात आले.

यावेळी “ती” चे प्रतिनिधित्व करणारी चिमुकली शालेय विद्यार्थिनी श्रीशा गायकवाड हिच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, राजेंद्र निकाळजे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, जैन सोशल ग्रुप डायमंड शहर उपाध्यक्ष संतोष छाजेड, उमा गायकवाड, उद्योजक ब्रजेशकुमार चोबे, शशिधरण पिल्लई, अमर कुंभार, सतीश देशमुख, राजेंद्र येळवंडे, उद्धव कुुंभार, लक्ष्मण इंगवले, बळीराम शेवते, विजय जगताप, संतोष चव्हाण, अमित डांगे, विजय बर्गे, हरिश्चंद्र राऊत यांची होती. चिमुकली श्रीशा गायकवाडया वेळी दोनही पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विवेक मुगळीकर म्हणाले,” वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराकरिता पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची सतत धावपळ सुरू आहे. नागरी सुरक्षेकरिता व सेवेकरिता तत्पर असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेणेही महत्वाचे आहे. हेल्मेट नक्कीच सुरक्षा कवच म्हणून आवश्यक आहे. समितीने शहरात राबविलेले हेल्मेट सुरक्षा अभियान नक्कीच स्वागतार्ह आहे. नागरिकांनीही दुचाकी चालविताना हेल्मेट वापरावे.”

निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, शंकर आवताडे, समिती अध्यक्ष विजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विजय मुनोत यांनी केले. आभार विभाग प्रमुख सतीश देशमुख यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.