Nigdi : लायन्स क्लब ऑफ पुणे भक्ती-शक्ती सेलिब्रेशनच्या अध्यक्षपदी हेमंत देवकुळे

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब ऑफ पुणे भक्ती-शक्ती सेलिब्रेशनच्या अध्यक्षपदी हेमंत देवकुळे यांची निवड झाली.

आकुर्डी येथे पदग्रहण समारंभ पार पडला. 2019-20 या वर्षीची कार्यकारिणी यावेळी तयार करण्यात आली. एमजेएफ लायन रवींद्र देशपांडे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. कार्यक्रमासाठी प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, सलीम शिकलगार, पुणे जिल्हा बॅंकेचे सरव्यवस्थापक छगनराव इंगळे, संजय निंबाळकर, सविता निंबाळकर, अशोक येवले, हरिदास नायर, चंद्रशेखर पवार, प्रदीप कुलकर्णी, दिलीप सिंह मोहिते आदी उपस्थित होते.

कार्यकारीणीत सचिव पदावर विजय भालेराव तर खजिनदार पदी विजय ओवले यांची निवड करण्यात आली. मीनांजली मोहिते व श्रद्धा ओवले यांनी सूत्रसंचालन केले. राजीव कुटे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.