Nigdi : निगडी बस स्टॉप येथे बेघर, निराधारांना मिळतेय दोन वेळचे जेवण; दररोज 400 नागरिकांना अन्नदान

एमपीसी न्यूज : कोरोनामुळे सुरु आलेल्या लॉकडाऊनमध्ये बेघर, निराधार, स्थलांतरित मजूर आणि गोरगरीब झोपडीधारकांसह दिव्यांगांचे अन्नावाचून होणारे हाल दूर करण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार निगडी बस स्टॉपयेथे अन्नदान सुरु करण्यात आले. या ठिकाणी दुपारी आणि संध्याकाळी सुमारे 400  नागरिकांना मोफत अन्नदान करण्यात येत आहे. तसेच येथे सोशल डिस्टंसिन्गचे काटेकोर पालन केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्चला संपूर्ण देशभर लॉकडाऊन लागू केला. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. वाहतूकही बंद झाली. त्यामुळे गोरगरीब नागरिकांचे हाल सुरु झाले. यामध्ये दिव्यांग, शिक्षणासाठी व नोकरीसाठी शहरात एकटे राहत असलेले विद्यार्थी व नोकरदार, बेघर, निराधार, स्थलांतरित मजूर, हातावर पोट असणारे तसेच झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांसमोर जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी सचिन काळभोर यांनी निगडी बस स्टॉप येथे गणेश मंदिरासमोर 25 मार्चपासून  दोन वेळ मोफत जेवण वाटप करण्यास सुरुवात केली. येथे सकाळी 11 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत मोफत जेवण उपलब्ध करण्यात येत आहे.

याशिवाय कोरोनाच्या लढ्यात योगदान देण्यारे सफाई कर्मचारी, पोलीस, होमगार्ड आदींची जेवणाची व्यवस्था केली जात आहे. काळभोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राधिकरण पोलीस चौकी येथील झोपडपट्टी अन्नदान करण्यासाठी दत्तक घेतली आहे. येथे राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांना ते दररोज संध्याकाळी अन्नदान करतात. ओटास्किम येथील दिव्यांगांनाही घरपोहोच जेवण पुरविण्यात येत आहे. लॉकडाऊन लागू असेपर्यंत त्यांना अन्नदान करणार असल्याचे काळभोर यांनी सांगितले.

या सेवाकार्यात सचिन शिंदे, स्वप्निल पवार, बंडू जोशी, देवाराम देवाशी, रमेश वाघमारे, रमेश पुरोहित, सुनील अग्रवाल यांचं विशेष सहकार्य लाभत असल्याची माहिती  काळभोर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.