Nigdi : मोलकरणीचा सुमारे दीड लाखांच्या दागिन्यांवर डल्ला!; निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज – घरकाम करणा-या मोलकरणीने सुमारे 1 लाख 68 हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. याप्रकरणी मोलकरणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निगडी प्राधिकरण येथे घडली.

फातिमा नजमुलहुसेन शेख (वय 31, रा. यमुनानगर, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर, याप्रकरणी हिना इजाज शेख (वय 38, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमा ही हिना यांच्या घरी घरकाम करते. तिने घरकाम करत असताना 14 जून ते 2 सप्टेंबर 2019 या कालावधीत घरातील कपाटाच्या ड्रावरमधून सुमारे एक लाख 68 हजारांच्या सोन्याच्या सहा अंगठ्या चोरून नेल्या. याबाबत गुन्हा दाखल केला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.