Nigdi : वैविध्यपूर्ण पदार्थांनी नटलेला हॉटेल रागाचा टेन्डर कोकोनट फेस्टिव्हल

एमपीसी न्यूज- सध्या उन्हाळा जोरात सुरु आहे. त्यात बच्चेकंपनीच्या शाळांना सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. मात्र अजूनही रिझल्ट लागलेला नाही, त्यामुळे बाहेर फिरायला जाण्याचा तूर्तास बेत करता येत नाही. मात्र जोडून सुट्ट्या देखील आल्या आहेत. मग अशावेळी कुठेतरी मस्त, खमंग, चविष्ट खाण्याचा बेत करण्यास काहीच हरकत नाही. अशावेळी विचार कशाला करायचा प्राधिकरण येथील हॉटेल रागामध्ये खास टेंडर कोकोनट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हे स्पेशल टेन्डर कोकोनट फेस्टिव्हलचे तिसरे वर्ष आहे. आणि विशेष म्हणजे या फेस्टिव्हलमध्ये मागील दोन्ही वर्षांपेक्षा वेगळ्या डिशेस खवय्यांसाठी तयार करण्यात आल्या आहेत अशी माहिती हॉटेल रागाचे राहुल गावडे यांनी दिली.

येथे नारळाचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या विविध डिशेस आपल्याला चाखायला मिळणार आहेत. टेन्डर कोकोनट म्हणजे आपले शहाळे. आपल्याला वाटेल शहाळ्याच्या अशा काय वेगळ्या डिशेस असणार. पण या शहाळ्यापासूनही अनेकविध रुचकर पदार्थ बनवता येतात. फक्त भारतातच नव्हे तर जेथे किनारपट्टी आहे तेथे सर्वत्र नारळाचा मुबलक वापर केला जातो. अर्थातच प्रत्येक ठिकाणची चव वेगळी. कोकणातील मालवणी, केरळातील मलबार, थायी या पद्धतीच्या खाद्यसंस्कृतीमध्ये नारळाचा भरपूर वापर करुन अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. त्यात नारळाचा थोडासा गोडवा असतो. पण त्याचबरोबर ते चमचमीत, तिखट देखील असतात.

नेहमीप्रमाणे आपल्याला जेवणाची सुरुवात सूपने करायची असेल तर त्यासाठी खास चिल्ड कोकोनट सूप, मुर्ग औऱ नारियल का शोरबा, कोकोनट अँड सीफूड सूप आहे. शाकाहारी स्टार्टर्स मध्ये मश्रूम कोकोनट टिक, क्रिस्पी कोकोनट व्हेजीज, पनीर और नारियल के शीक येथे उपलब्ध आहेत. मांसाहारप्रेमींसाठी क्रिस्पी कोकोनट चिकन, मलाबार चिकन टिक्का, दाब चाल, कोकोनट प्रॉन्स अशा वैविध्यपूर्ण डिशेस आहेत.

मेन कोर्समध्ये शाकाहारी खवय्यांसाठी नारियल का कोर्मा, मखाना मश्रूम स्ट्यू, पनीर हरा मसाला या वेगळ्या डिशेस येथे आहेत. मांसाहारी खवय्यांसाठी कोकोनट मलाई चिकन, दाब चिंगरी, दाब तंगडी किंवा दाब मच्छी यासारख्या डिशेस येथे येऊन नक्कीच ट्राय करायला हव्यात. नारळाचे पदार्थ खाल्ल्यानंतर भात तर हवाच. कारण किनारपट्टीवरील जेवणात भात ही अपरिहार्य गोष्ट आहे. भात जेवल्याशिवाय जेवण पूर्ण झाले असे वाटतच नाही. त्यामुळे येथे खास नारली बिर्याणी ही शाकाहारी किंवा मांसाहारी या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे.
सध्या उन्हाळा जोरात आहे. त्यामुळे जेवल्यानंतर कुछ थंडा हो जाय असे वाटत असेल तर कोकोनट अँड मिंट कुलर आणि कोकोनट शेक या दोन स्पेशल पेयांचा यावेळी विशेष सहभाग करण्यात आला आहे. ज्यांना गोड खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाले असे वाटत नाही त्यांच्यासाठी खास नारळापासूनच तयार करण्यात आलेला कोकोनट डिलाईट हा गोड पदार्थदेखील येथे आहेत. फक्त गोड आवडणा-यांनीच नव्हे तर सर्वांनी हा गोड पदार्थ ट्राय करुन बघायलाच हवा.

नारळाच्या मनसोक्त वापराने सजलेल्या एकापेक्षा एक रुचकर आणि लज्जतदार डिश खास आपल्यासाठी या फेस्टिव्हलमध्ये तयार करण्यात आल्या आहेत असे शेफ विशाल यादव यांनी सांगितले आहे. सध्या हा फेस्टिव्हल सुरु झाला असून तो पुढील महिनाभर सुरु राहणार आहे.

हॉटेल रागा,
स्विमिंग पूलजवळ, प्राधिकरण, आकुर्डी,
फोन – 8888077799 ,020 27657799

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.