Nigdi : प्राधिकरणातील हॉटेल रागा येथे लज्जतदार सी फूड फेस्टिव्हल

एमपीसी न्यूज- अनेकविध आठवणींनी भरलेल्या 2018 ला निरोप द्यायला आता फारच थोडे दिवस उरले आहेत. सध्या प्रत्येकाला नवीन वर्षे कसे साजरे करता येईल याचे वेध लागले आहेत. त्यातच गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. हवेत हवाहवासा गारवा भरून राहिला आहे. अशावेळी चमचमीत नॉनव्हेज कुठे चांगले मिळेल याचा शोध खरे खवय्ये घेत असतात. त्यातही ही जर ताज्या फिशची लज्जतदार डिश असेल तर मग काय विचारूच नका. पुलंच्या भाषेत भगवंताचा पहिला अवतार नटून सजून आकर्षक रुपडे घेऊन ताटात समोर हजर झाला तर स्वर्गसुख म्हणजे आणखी वेगळे काय ते सांगायलाच नको. आता तुम्हाला वाटेल भगवंताचा पहिला अवतार ही काय भानगड आहे बुवा? अहो वेगळे काही नाही म्हणजे फिश हो…आणि ख-या खवय्याची फिश खाण्याची हौस पूर्ण करण्यासाठी सध्या प्राधिकरण येथील हॉटेल रागामध्ये लज्जतदार सी फूड फेस्टिव्हल सुरु आहे. एक सो एक लाजबाब डिशेस येथे आपल्याला चाखायला मिळणार आहेत. हा फेस्टिव्हल येत्या 30 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

जेवणाची सुरुवात करताना झिंगा पांढरा रस्सा, चिली कॉर्न सी फूड सूप, थाई सी फूड अँड कोकोनट सूप, टॉम यम कुंग सूप आणि सी फूड लेमन सूप आपल्यासाठी येथे उपलब्ध आहेत. स्टार्टरस् मध्ये देखील खूप व्हरायटी आहे. मच्छी कुरकुरे तर अफलातून. तसेच स्क्विड हा खास मासा येथे स्टार्टरच्या स्वरुपात उपलब्ध आहे. जम्बो सी फूड प्लॅटर, प्रॉन्स प्लॅटर आणि सुरमई प्लॅटरदेखील येथे आहेत. तंदुरी प्रकारात बेबी सुरमई आणि पापलेट तर आहेच आहे. शिवाय उपलब्धतेनुसार लॉबस्टर आणि जम्बो प्रॉन्सच्या तंदुर डिशदेखील येथे मिळू शकतात. फक्त सूप आणि स्टार्टर्समध्येच नाही तर येथे मेन कोर्समध्येदेखील खूप चविष्ट आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिश आहेत. गावरान, मंगलोरियन, मलाबारी, कोंकणी, थाई प्रकारात प्रॉन्स, पापलेट, सुरमई, खेकडा आणि कटला फिश उपलब्ध आहेत. तसेच प्रॉन्स मोईली, दही माछ, मच्छी कोफ्ता करी, सुकट मसाला येथे मिळू शकतात.

याशिवाय लेमन राईस, प्रॉन्स पुलाव, प्रॉन्स बिर्याणी, फिश बिर्याणी असे भाताचे विविध प्रकारदेखील खास उपलब्ध आहेत. मत्स्याहारप्रेमींना पुरेपूर खूष करेल असा हा एकंदरीने मेन्यू असून थंडीत फिश मोठ्या प्रमाणावर मिळत असतो. त्यामुळे या चमचमीत माशांवर मनसोक्त ताव मारण्यासाठी प्राधिकरण येथील हॉटेल रागा येथे भेट द्यायलाच हवी.
हॉटेलमध्ये आल्यानंतर वेटिंग करायला लागण्यापेक्षा यायच्या आधी फोनवरुन आपले टेबल बुक करण्यासाठी 88880 77799 / 020 2765 7799 या क्रमांकावर फोन करा.

हॉटेल रागा,
स्विमिंग पूलजवळ, प्राधिकरण, आकुर्डी,
फोन – 88880 77799, 020 2765 7799

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like