Nigdi : वृक्षतोडीच्या निषेधार्थ उद्या निगडीत मानवी साखळी

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहराला औद्योगिकनगरी बरोबरच हरितनगरी म्हणून ओळखले जात होते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून शहरातील अनेक वृक्षांची बेकायदेशीरपणे तोड करण्यात आली आहे. त्यामुळे शहराची हरितनगरी असलेल्या ओळखीला तडा जाऊ लागला आहे. वृक्षतोडीच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने कनेक्टींग एनजीओच्या बॅनरखाली रविवारी (दि.2)निगडी मानवी साखळी करण्यात येणार आहे. या माध्यमातून वृक्षतोडीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

निगडीतील टिळक चौकात सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत मानवी साखळी होणार आहे. या मानवी साखळीत 19 ते 20 सामाजिक संस्थासह 100 ते 150 नागरिक सहभागी होणार आहेत. या मानवी साखळी दरम्यान कुठल्याही प्रकारची निदर्शने केली जाणार नाहीत. शांततेच्या मार्गाने मानवी साखळी करुन वृक्षतोडीचा निषेध केला जाणार आहे. तसेच वृक्षतोडीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.