Nigdi : घरगुती वादातून पतीने केले पत्नीवर तलवारीने वार; पतीविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरगुती कारणावरून झालेल्या वादात पतीने पत्नीच्या हातावर तलवारीने वार केले. यामध्ये पत्नी जखमी झाली. ही घटना गुरुवारी (दि. 12) सकाळी ओटास्किम निगडी येथे घडली.

शायनाज आसिफ शेख (वय 20, रा. ओटास्किम निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आसिफ जब्बार शेख (वय 23) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शायनाज आणि आरोपी आसिफ पती-पत्नी आहेत. शायनाज गुरुवारी त्यांच्या माहेरी गेल्या. माहेरी चहा पित असताना आरोपी त्यांच्याकडे आला. त्याने ‘माझी मुलगी मला दे, मी तिला घरी घेऊन जाणार आहे.’ असे म्हणत भांडण सुरु केले.

त्यावर शायनाज यांनी मुलगी देण्यास नकार दिला. यावरून आसिफ याने शायनाज यांच्या तळहातावर लहान तलवारीने वार करून जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.