Nigdi : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक केली. ही कारवाई निगडी पोलिसांनी पीएमपीएमएल बस स्टॉपजवळ रविवारी (दि. 13) रात्री साडेआठच्या सुमारास केली.सिद्धेश्वर धर्मदेव शर्मा (वय 22, रा. तरसवस्ती, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस नाईक विलास सोमनाथ केकाण यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी मधील पीएमपीएमएल बस स्टॉपच्या संरक्षक भिंतीजवळ एक तरुण संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार सापळा रचून सिद्धेश्वर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकजवळ दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 75 हजार 400 रुपयांचा ऐवज आढळला. यावरून त्याला अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.