Nigdi: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी पुरस्कारांची घोषणा

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी(Nigdi) निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी हे पुरस्कार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनीलजी देवधर यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.

हा कार्यक्रम आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह(Nigdi)येथे सायंकाळी 6.30 वाजता प्रदान केले जातील. या पुरस्कारांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार हा शुभान फाउंडेशन, मिझोराम आणि राज्यस्तरीय पुरस्कार स्वयंसिद्धा, कोल्हापूर या संस्थांना घोषित करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे दरवर्षी देण्यात येणारे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांचे हे 16 वे वर्ष आहे, अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्यावतीने देण्यात आली.

 

Pimpri : नूपुर नृत्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात 70 पेक्षा जास्त विद्यार्थीनींनी सादर केली मनमोहक नृत्य

मिझोराम राज्यामध्ये स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी ‘शुभान फौंडेशन’ यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि तीन दशकांहून अधिक काळ ‘स्वयंसिद्धा’ संस्थेच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता, अन्याय निवारण तसेच आरोग्यविषयक कार्य करीत असलेल्या संस्थेची निवड करण्यात आली आहे.

पुरस्कार प्रदान सोहळा सर्वांसाठी खुला असून सर्व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांनी केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.