BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi: स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी निगडीतील ध्वजस्तंभावर डौलाने फडकला तिरंगा

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच असलेल्या निगडीतील ध्वजस्तंभावर पुन्हा डौलाने तिरंगा फडकला आहे. उद्या स्वातंत्र्य दिन असून आज (बुधवारी) महापालिकेने राष्ट्रध्वज फडकाविला आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यानंतर पुन्हा तिरंगा फडकला आहे.

देशाच्या राष्ट्रध्वजाविषयी असलेले प्रेम नव्या पिढीच्या मनात कायम रुजत राहावे, या हेतूने पिंपरी-चिंचवड महापालिकेने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान परिसरात सुमारे 107 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाची उभारणी केली आहे. गतवर्षी 26 जानेवारी 2018 रोजी याचे उद्घाटन करण्यात आले होते.

  • साडेतीन महिन्यापूर्वी 1 मे रोजी राष्ट्रध्वज फडकविण्यात आला होता. त्यानंतर मात्र राष्ट्रध्वज काढून ठेवला होता. गेल्या चार महिन्यांत तब्बल आठ वेळा राष्ट्रध्वजाचे कापड फाटले होते. वा-याचा वेग आणि वजनामुळे वारंवार ध्वज काढण्याची वेळ येत होती. वा-याचा फटका बसला की शिलाई उसविली जात असल्याने ध्वज फडकता ठेवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे महापालिकेने ध्वज काढून ठेवला होता.

त्यानंतर आज स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी ध्वजस्तंभावर तिरंगा फडकाविला आहे.

  • याबाबत कार्यकारी अभियंता संजय खाबडे म्हणाले, महापालिकेने आठ महिने ध्वज फडकता ठेवण्याचे नियोजन केले आहे. पावसाळ्यात ध्वज काढून ठेवण्यात येणार आहे. या ध्वजाच्या देखभाल-दुरुस्तीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. उद्या स्वातंत्र्य दिन असल्याने आज ध्वज फडकविला आहे. 1 ऑक्टोंबारपासून 31 मे पर्यंत दररोज ध्वज फडकता ठेवण्यात येणार आहे.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3