Nigdi: आयआयसीएमआरच्या एमसीए विद्यार्थ्यांचा ‘इन्डक्शन’ सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – निगडी येथील आयआयसीएमआर महाविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या एमसीए विद्यार्थ्यांचा ‘इन्डक्शन’ समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पर्सिस्टन्ट सिस्टिमचे असोसिएट व्हॉइस प्रेसिडेंट आणि कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया पुणेचे अध्यक्ष अभय पेंडसे होते.

अभय पेंडसे म्हणाले, ” एखादे ‘स्किल’ घेऊन नोकरी मिळवण्याचा जमाना आता राहिला नाही. विद्यार्थ्यांनी स्वतःला मल्टी स्किल्ड कसे बनवता येईल याकडे लक्ष्य देण्याची गरज आहे. सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी या गोष्टींना मागणी आहे. माहिती तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. पूर्वी 20 वर्षांत जे घडले तेच आता दोन वर्षात घडत आहे. त्यामुळे स्वतःला कायम अपडेट ठेवणे महत्वाचे आहे. तुमच्या ज्ञाना बरोबरच तुमच्या अटीट्युड आणि संभाषण कौशल्याला पण तेवढेच महत्व आहे”

आयआयसीएमआरच्या संचालिका डॉ. दीपाली सवाई यांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल आणि एमसीएच्या कोर्स बद्दलची सविस्तर माहिती दिली. संस्थेच्या शिक्षकांनी लिहिलेल्या विविध संगणक प्रणालीवरील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. दुस-या दिवशी विपशना साधनेबद्दल कपिल धाटांगणे यांनी विद्यार्थांना माहिती दिली. विपशना केल्याने भविष्यात यश मिळविण्यास मदत होते असेही ते म्हणाले.

अनामिका दासगुप्ता यांनी सॉफ्ट स्किलचे महत्व व त्याबद्द्ल मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी सौरभ गोडबोले यांनी उत्कृष्ठ मॅनॅजमेन्ट गेम्स आयोजित केल्या होत्या. सर्व नवीन प्रवेशीत विद्यार्थी त्यात सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एमसीएच्या द्वितीय वर्षातील राहुल रवींद्रन, श्रुतिका कडवे यांनी केले. तर, रेणू मॅथ्यू आणि डॉ. प्रिया देशपांडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.